त्याच्या चित्रांमध्ये नेहमी एक छोटीशी स्टोरी असते. कपल मधला एखादा मोमेंट, नवरा-बायको मधलं संभाषण, लेट-नाईट थॉटस, अर्ली-मॉर्निंग मेडीटेशन्स, पोरांचा दंगा, फॅमिली पिकनिक, वगैरे वगैरे. त्याची चित्रं कमालीची सिंपल असतात.
‘पास्कल कॅम्पीयोन‘ (Pascal Campion) नावाचा हा आर्टिस्ट मी फेसबूकच्या अगदी सुरुवातीच्या काळापासुन फॉलो करतो.
त्याच्या चित्रांमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे चित्रं काढतांनाची त्याची कमालीची बेफिक्री. आपण काढलेला हात, हातासारखा दिसत नाही किंवा डोळा, डोळ्यासारखा दिसत नाही याचा तो फारसा विचार करत नसावा. परफेक्शनचा कुठलाही अट्टाहास नाही. त्याचं लक्ष असतं ते रंगांकडे आणि लाईटकडे. त्यामुळे, त्याच्या चित्रांमधला फ्रेशनेस उठून दिसतो.
सोशल मीडियावर अशी छोटी छोटी चित्रं काढण्याखेरीज हा व्यक्ती काय करत असावा, असा प्रश्न मला नेहमी पडतो. अर्थात तो कन्सेप्ट आर्टिस्ट आहे. बऱ्याच अनिमेशन मुव्हीजसाठी कन्सेप्ट तयार करण्याचे काम तो करतो.
कमालीची सजेस्टिव आणि मिनीमल चित्रं काढणारा हा बिनधास्त व्यक्ती आळशी मात्र नक्कीच नाही, उलट तो गेली बारा ते तेरा वर्ष रोज न चुकता एक चित्र पोस्ट करतो. एवढी वर्ष सातत्याने चित्रं काढणे आणि शेअर करणे म्हणजे कमालच आहे, नाही का?
प्रश्न हा आहे की, सोशल मीडिया पर्यंत ठीक आहे, पण हा गडी आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्येही असाच बिनधास्त असेल का?
तो रोज काढत असणारी चित्रं त्याला तसं घडवत गेली, की तो जसा आहे तसा चित्रांना घडवत गेला?
काहीही असो, त्याच्या इनपरफेक्शन मध्ये एक वेगळीच मजा आहे.
त्याच्या चित्रांची झलक तुम्ही येथे बघू शकता-