इमोशनल इंटेलिजन्स

(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

इमोशनल इंटेलिजन्स चार भागांत मोजता येतं.
एक, इमोशन्स् तुम्ही कसे आकलन करता (परसिव्ह).
दोन, तुम्ही इमोशन्स् चा कसा वापर करता (युज).
तीन, तुम्ही इमोशन्स् कसे समजुन घेता (अंडरस्टँड).
चार, तुम्ही इमोशन्स् कसे सांभाळता (मॅनेज). 

यातील पहिला भाग, तुम्हाला स्वतः बद्दल किती जाणीव आहे हे दाखवतो. 
तुम्ही स्वतःला किती आणि कसे सांभाळू शकता हे दुसरा भाग सांगतो.
तिसरा भाग, सामाजिक भावनेबद्दल तुम्हाला काय जाणीव आहे हे दाखवतो.
तर चौथा भाग, तुम्ही तुमचे रिलेशन्स कसे मॅनेज करता हे सांगतो. 

थोडक्यात, इमोशन्स् आकलन करणे, समजुन घेणे, जाणीव पूर्वक वापरणे आणि मॅनेज करणे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स.

इमोशनल इंटेलिजन्स ही ॲबिलिटी आहे. स्किल आहे. गिफ्ट नाही. हे इम्प्रूव्ह करता येतं.

 

इतर नोट्स

इतर पोस्ट्स