ऑफिस मध्ये बराच उशीर झाला होता.
आठ वाजले असतील साधारण.
मी कामात गर्क होतो.
तेवढ्यात बॉसचा फोन आला.
अमेरिकेतल्या एका प्रोजेक्ट मध्ये सॉलिड प्रोब्लेम झालाय म्हणे.
“ताबोडतोब अमेरिकेसाठी निघ!”
मी आपला सर्वसाधारण मध्यमवर्गीय प्रश्न विचारला “सर, वीसा?”
आधीच वैतागलेला बॉस जवळजवळ खेकखसलाच “तु ऐरपोर्टवर पोच आधी वीसा तुला तिथेच मिळेल.”
मी कंपनीच्याच कारने कसाबसा पोहचलो.
फ्लाइट मध्ये बसल्या बसल्या जी झोप लागली ती सरळ जे एफ के ला उतरल्यावरच उघडली.
बाहेर एक कलीग उभाच होता. त्याच्या सोबत गाडीत बसलो.
सुसाट धवणाऱ्या त्या गाडीतून ओझरती अमेरिका मी न्याहळत होतो. दिवसभरतली एक एक गोष्ट आठवत होती.
अचानक वीज चमकावी तसा डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
मी अमेरिकेला चाललोय हे तर मी बायकोला सांगीतलेच नाही.
दरदरून घाम फुटला.
खाडकन जाग आली.
बायको शांतपने पेपर वाचत बसली होती.
मी पांघरुणातूनच तिच्याकडे पाहून हसलो
आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
आज रविवार आहे मी विसरलोच!