गोवा, ३१ डिसेंबर

(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

गोव्यातील लोकांची परिस्थिती आज पंढरपूरातील लोकांसारखी आहे.

भाविकांचे लोंढेच्या लोंढे येतायेत. लोकं आपली छोटी छोटी दुकानं मांडून बसली आहेत.
कारमधून येणारे, बाईकवरून फिरणारे, पायी हिंडणारे सगळे चंद्रभागेच्या दिशेने जातायेत. कुणी कीर्तनाचा गजर ऐकून तिकडे धाव घेतायेत. कुणी ‘उपवास’ सोडण्याची सोय करतोय.

शेवटी उद्देश एकच, मार्ग फक्त वेगळे.

येणारं वर्ष आपल्याला ‘मार्ग’ दाखवणारं येवो हीच देवा चरणी प्रार्थना.

इतर पोस्ट्स