अमृताच्या पैजा

(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

पुण्यात पेठांमध्ये फिरतांना जर चहा प्यावा वाटला तर ‘अमृततुल्य’ जरूर प्यावा.

पुणेकराचं हे अमृत अगदी गोड खीर प्यावी असं असत. हल्ली या अमृता सोबत क्रीम रोल नावाचा ‘एनर्जी बार’ पण मिळतो.

गोड + अती गोड = काय? याचा अनुभव एकदा घेऊनच बघा.

डायबेटिस असणाऱ्याने याच्या वाट्याला जाऊ नये. उगाच अमृताच्या नादात उरलं सुरलं अमरत्व जायचं.

या अमृताची दुकाने नेहमी ‘नो पार्किंग’ च्या हद्दीतच असतात. पण अमृत प्राशन करणाऱ्या कुठल्याच पुणेकराची गाडी ट्राफिकच्या ‘यमांनी’ उचलतांना मी पाहिली नाही. आपण देव आहोत अश्या थाटात पुणेकर ते अमृत ढोसतात. आपण ब्रेड पेटिस, वडा पाव अस काही निकृष्ट खात असतांना आपली गाडी उचलली जाऊ शकते. पण अमृत प्राशन करताना नाही.

असेच एकदा, मी पेटिस खात असताना माझी गाडी उचलायला ते दानव आले होते. पण मी ही आमच्या घरची लक्ष्मी गाडी वर बसवून ठेवली होती म्हणून वाचलो. देवीचा प्रकोप त्यांना माहित असावा. आणि आमच्या घरचा प्रकोप बघण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला नाही. नशीब एकेकाच. असो.

तर,
बायको तुळशी बागेत सैरावैरा भटकत असतांना, रस्त्याच्या कडेला एकाकी हताश उभे राहण्याची वेळ जर तुमच्या वर आली,
तर एकदा अमृततुल्य जरूर प्यावा.

आणि आपण रोज सकाळी घरी चहाच्या नावाखाली काय काय पितो हे ज्याच त्यानं ठरवाव.

घरी पोहचे पर्यंत तुम्ही ‘अमर’ आहातच.

इतर पोस्ट्स