थॉट एक्सपेरिमेंटस्
‘व्हॉट इफ . . .?’ या प्रश्नांचं उत्तर शोधणे म्हणजे ‘थॉट एक्सपेरीमेंट’.
१९३५ सालातला ‘श्रोडींजर्स कॅट‘ (Schrodinger’s Cat) नावाचा ‘थॉट एक्सपेरीमेंट’ फार प्रसिद्ध आहे.
श्रोडींजरच्या या वैचारिक प्रयोगानुसार, एका बंद बॉक्स मध्ये एक मांजर आणि एक विषारी वायू असलेलं यंत्र आहे. पुढील एका तासात या यंत्रातून विषारी वायू बाहेर पडून मांजर मरण्याची पन्नास टक्के शक्यता आहे. म्हणजे, एका तासानंतर मांजर मेलेली किंवा जिवंत असेल. बॉक्सचं झाकण उघडल्यावर ते कळेलही. पण जोवर बॉक्सचं झाकण आपण उघडुन बघत नाही तोवर मांजर मेलेली – जिवंत दोन्हीही आहे. या अवस्थेला ‘क्वांटम मेकॅनिकस्’ मध्ये ‘सुपरपोसिशन’ असं म्हणतात.
चांगलं – वाईट अशा ‘सुपरपोसिशन’ मध्ये असणारे बरेच प्रसंग, अनुभव, आणि माणसं सोबत घेऊन आपण जगतो. त्यावरचं झाकण उघडुन बघण्याचा हा छोटासा प्रयत्न.
‘दी बिग बँग थियरी’ मध्ये शेल्डनने ‘श्रोडींजर्स कॅट’ हा ‘थॉट एक्सपेरीमेंट’ भन्नाट समजावून सांगितला आहे. तो सीन तुम्ही इथे बघू शकता.