हल्ली ती मला ऑफिसला ड्रॉप करते.
संध्याकाळी पिक करते.
निदान त्यामुळे तरी मी ऑफिस मधून लवकर काढता पाय घेतो.
पण आज म्हटलं ‘वटसावित्रीचा’ स्पेशल दिवस आहे, आमच्या सावित्रीला थोडा आराम द्यावा.
म्हणून आज रिक्षानी गेलो.
सकाळी मोबाईल खेळताखेळता माझं फारस लक्ष ही नव्हतं.
येतांना मात्र रिक्षात बसलो न बसलो तो रिक्षावाला असा सुटाट सुटला की…
तिने आज वडाला गुंडाळलेले सगळे धागे गळुन पडले असतील कदाचित!
बर, आता हा रिक्षात बसलेला ‘सत्यवान’ आजच वर येतो की काय ह्या भीतीने
आणि
हा आला तर ती खालची सावित्री आपल्याला काही सोडणार नाही या धाकानं
बिच्चारे देव ही वर दबा धरून बसले असतील.
जिव मुठित धरून मी कसाबसा घरी आलो.
आमची सावित्री किचन मध्ये ‘बिसिबेले भात’ बनवत होती.
त्याचा घमघमाट देवांपर्यन्त पोहचला असावा
कदाचित, म्हणूनच मी वाचलो.