१
फसलेला प्रयोग
साल १९६८.
थ्री एम कंपनीची लॅब.
डॉ स्पेंसर सिल्व्हर एक ‘सुपर स्ट्रॉंग अढेझिव्ह‘ म्हणजे अत्यंत चिकट पदार्थ बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करीत होते.
प्रयोगाच्या शेवटी जो अढेझिव्ह बनला तो लो-रेटचा होता.
म्हणजे, कुठल्याही पृष्ठभागाला तो हलकेच चिकटायचा पण काढतांना सहज निघूनही यायचा.
थ्री एम मॅनेजमेंटच्या लेखी हा अढेझिव्ह कुठल्याही कामाचा नव्हता. त्यांनी हा प्रोजेक्ट बंद केला.
डॉ सिल्व्हर जिद्दी माणूस .
हा अढेझिव्ह कुठेतरी वापरता येईल याची त्यांना खात्री होती.
पुढची पाच वर्षे डॉ सिल्व्हर आपलं हे सोल्युशन विदाऊट प्रॉब्लेम वेगवेगळ्या कॉन्फरन्स मध्ये लोकांना दाखवत राहिले.
१९७३ मध्ये त्यांचा सहकारी असणाऱ्या अर्थुर फ्रायने डॉ सिल्व्हर यांचा सेमिनार ऐकला.
फ्राय चर्च मध्ये गाणी गायचा. गाणी म्हणतांना गाण्यांच्या पुस्तकात ठेवलेलं बुकमार्क सारखं खाली पडायचं. डॉ सिल्व्हरच लो-रेट अढेझिव्ह त्याने बुकमार्कला लावून पाहिलं. बुकमार्क सहज चिकटला आणि नंतर सहज काढताही आला. युरेका !
डॉ स्पेंसर सिल्व्हर आणि अर्थुर फ्राय यांनी थ्री एम ला या प्रोजेक्ट वर पुन्हा काम करण्याची परवानगी मागितली. मॅनेजमेंटने ती दिलीही.
दोघांनी बऱ्याच गोष्टींसाठी हे अढेझिव्ह वापरण्याचा प्रयत्न केला.
एकेदिवशी त्यांच्या लॅब समोर पिवळ्या रंगाचे स्क्रॅप पेपर्स पडले होते. त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला हा लो-रेट अढेझिव्ह लावण्यात आला.
आणि शेवटी १९७८ मध्ये जन्म झाला थ्री एमच्या सर्वात पॉप्युलर प्रॉडक्टचा – पोस्ट इट स्टिकी नोट्स.
एक लो- रेट म्हणावल्या गेलेलं प्रॉडक्ट डॉ सिल्व्हर यांच्या जिद्दीने आणि अर्थुर फ्रायच्या डोळसपणाने जगासमोरआलं.
रातोरात व्हाइरल झालं.
लोकांनीही ते अक्षरशः डोक्यावर घेतलं.
प्रत्येक ऑफिस मध्ये दिसायला लागलं.
१९८० पर्यंत ते जगभर पसरलं.
आज पोस्ट इट इनोवेशन साठीच टूल म्हणूनही वापरण्यात येतं.
स्टिकी नोट्सचं जगभरातलं मार्केट २३०० मिलियन डॉलर आहे.
त्यात एकट्या थ्री एमचा शेयर ७७% आहे.
वर्षाला थ्री एम ५० बिलियन म्हणजे ५००० कोटी पोस्ट इट नोट्स बनवते.
एक फसलेला प्रयोग ते एक पॉप्युलर प्रॉडक्ट हा पोस्ट इटचा प्रवास.
. . .
२
दरवाजे
सकाळी घरातून निघालो.
दरवाजा उघडला.
सेफ्टी डोअर उघडलं.
लिफ्ट चं बटण दाबलं. लिफ्ट आली. दरवाजा उघडला.
मग गाडीचा दरवाजा …
असे किती दरवाजे आपण रोज उघडतो.
काही बंद असतात, तर काही सताड उघडे.
प्रत्येक ठिकाणी जातांना आपण कुठल्या तरी दरवाज्यातून आत जातो आपण .
प्रत्येक दरवाज्यात संधी असेलच असं नाही.
मुद्दा हा आहे की, दरवाजे खूप आहेत, संधी कुठेनाकुठे मिळेलच.
. . .
३
ऑपनहाइमर
गोल्डन ग्लोब मुळे ऑपनहाइमर पुन्हा चर्चेत आला.
या चित्रपटाच्या सिनेमॅटिक एस्पेरीयेंसच फार कौतुक ही झालं. मिळालेल्या पाच गोल्डन ग्लोबने ते अधोरेखित झालं.
विशेष कौतुक आहे ते ख्रिस्तोफर नोलन चं.
दर वेळी काहीतरी नवीन आणून प्रेक्षकांना हा गडी तृप्त करतो.
आपलं वेगळं पण त्याला सिद्ध करण्याची गरज नाही.
पण ते ऑस्कर मिळवणं राहिलय बघा.
कधी देणार आहात तुम्ही नोलनला ऑस्कर?
आता पर्यंत पाच नॉमिनेशन झालीत!
डंकर्क साठी बेस्ट डायरेक्टर,
मेमेंटो आणि इन्सेप्शन साठी बेस्ट राईटर,
डंकर्क आणि इन्सेप्शन साठी बेस्ट प्रोडूसर.
ऑपनहाइमरच्या रूपानं नोलनच्या पदरात ऑस्कर पडावं एवढीच आम्हां भोळ्या फॅन्सची ईच्छा.