मिस्ड कॉल

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

१.

“सॉरी, कॉल मिस झाला.” मी

“हरकत नाही.”

“अरे! अर्जंट काम होतं, तू बिझी आहेस का?” मीच

– आता काय अर्जंट काम आहे  –

“कॉल का नाही उचलला . . .?” 

“मी दुसऱ्या रूम मध्ये होतो.”

“फोन सायलेंट वर होता.”

“बाहेर होतो.”

“करणारच होतो.”

“कॉल लागत नव्हता.” मी

“हा नेहमीच काहीतरी कारणं देतो” 

“कामाच्या वेळी टाळाटाळ करतो”

“बाकीचे पण उचलत नाहीत की, फोन” मी

” त्याचं एवढं अर्जंट नसतं रे, तुझ्या वर जबाबदारी आहे.” मीच

– फार कटकट आहे, यार याची –


२.

“सॉरी, कॉल मिस झाला.” मी

“अरे, मी कॉल केला होता. थोडा वेळ आहे का?” मीच

– म्हणजे, गेला आता पूर्ण दिवस. सगळं घोड्यावरच पाहिजे –

“हो, बोला !” मी

“नाही. तसं नको करायला. आपला खूप वेळ जाईल.” मी

“अरे, पण हे करावंच लागेल. (तुझं काम आहे. तू करायलाच पाहिजे)” मीच

– मी नाही करणार. जा! जे करायचे, ते करून घ्या!! –

“ओके. पण आता नको करायला. पुढे बघू” मी

” नाही. उरकून टाकूयात. पुन्हा प्रश्न नको.’ मीच

– जाऊ दे! संपवून टाकू एकदाचं. –


३.

“सॉरी, कॉल मिस झाला.” 

“फोन जवळच ठेवायला पाहिजे”

“उगाच भडका भडकी नको”

“रिंग टोन मोठी ठेऊ का?”

“खूप मोठी आहे आपली रिंग टोन. इरेटेतींग आहे. बदलू का?”

“अक्च्युली, फोनच बदलायला पाहिजे”

“नवीन फोन नाही लाँच झाला, इतक्यात.”

“तो एक चांगला आहे, की! परवा पाहिला तो.”

“एवढा महाग नको.”

“तसंही, आपल्याला कशाला हवाय फोन.”

इतर पोस्ट्स