(Halo Effect)
एखाद्या बद्दलची पहिल्या काही सेकंदात एक गोष्ट आवडली, तर इतरही गोष्टी चांगल्याच असतील असे गृहीत धरून पुढे जाणे म्हणजे ‘हेलो इफेक्ट.’
फर्स्ट इम्प्रेशन – एखाद्या बद्दलच पहिल्या काही सेकंदात आपण जे मत बनवतो त्याचं आधारावर आपली पुढची सगळी मते अवलंबून राहतात.
साधं उदाहण – एखाद्याचं शर्ट तुम्हाला आवडलं म्हणजे त्याची कलर्सची चॉइस चांगली असणार, हे तुमचं पहिलं इम्प्रेशन. त्याची सगळ्याच गोष्टींची चॉइस चांगली असणार हे गृहीत धरणं म्हणजे हेलो इफेक्ट.
अनुक्रम (सिक्वेन्स) – हे फक्त आवडत्या गोष्टी पुरतं मर्यादित नाही. नावडत्या गोष्टींबद्दल सुद्धा आहे.
एखाद्याचे गुण आपण कुठल्या अनुक्रमात पाहतो त्यावर इतर गुण चांगले की वाईट ठरतात. या क्रमामध्ये पहिला गुण नेहमी भारी पडतो.
यशस्वी माणसाचं हट्टी असणं फारसं वाईट मानल्या जात नाही.
पण हट्टी माणूस यशस्वी असला तरी फार भाव दिल्या जात नाही.
कारण गुणांचा सिक्वेन्स.
बेनिफिट ऑफ डाऊट – पेपर तपासतांना पहिल्या उत्तराने इम्प्रेस होऊन पुढच्या साधारण उत्तरांनाही चांगले मार्क्स देत जाणे म्हणजे हेलो इफेक्ट.
पहिल्या इम्प्रेशन मुळे आपल्या विचारांत एक कन्सिस्टन्सी येते. कम्फर्ट येतो. कंटाळा येतो डिसिजन घेण्याचा. मग हा गॅप ‘गेसिंग’ ने भरला जातो आणि मार्क्स वाढत जातात.
स्वतंत्र स्त्रोत – एखाद्या व्यक्ती अथवा घटनेसंदर्भातील प्रत्येकाचा हेलो इफेक्ट वेगळा किंवा स्वतंत्र असतो.
एखादी महत्त्वाची माहिती गोळा करायची असल्यास प्रत्येक स्त्रोत (सोर्स) स्वतंत्र ठेवला जातो.
म्हणूनच, साक्षीदार जास्त असल्यास, पोलीस त्यांना वेगवेगळे ठेवतात आणि चौकशीही वेगवेगळी होते. जर ही साक्षीदार मंडळी एकत्र आली तर कुण्या एकाचं मत भारी ठरून तेच सगळ्यांचं होऊ शकतं. यालाच ‘इन्फ्ल्यून्स’ असं म्हणतात.
ऑफिस मीटिंग मध्येही पहिल्यांदा जो मत मांडतो त्याचाच सुर पकडून बहुतेक जण बोलतात. ह्या हेलो इफेक्टचा अनुभव कदाचित तुम्हाला आला असेलही. असो !
हेलो इफेक्ट थोडक्यात, एक कोरिलेशन एरर आहे.
(Daniel Kahneman, Thinking, Fast and Slow मधून साभार)