पुरुषाचं काहीही काम नसलेलं ठिकाण.
तरीही पुरुष असतात. साड्या दाखवणारे. बघणारे.
आपल्या सोबतच्याला काहीही कळत नाही.
पण साडी दाखवणाऱ्या पुरुषाला सगळं कळतं.
सोबतच्याला कळतंय याची भीती दाखवणाऱ्याला असते.
तो मधून मधून लक्ष ठेवतो त्याच्या कडे.
आपल्या समोर, आपल्याच बायकोला समोरचा गंडवतोय हे सोबतचा थंडपणे बघत असतो.
एक, तुम्हाला यातलं काही कळत नाही.
दुसरं, मला काही चूज करण्याचं फ्रीडमच नाही. वगैरे वगैरे.
कुठल्या स्त्रीवर कुठली साडी उठून दिसते हे सोबतचाही जाणतो.
पण सगळं कळतं ते साडी दाखवणाऱ्यालाच!
असो !