संडे मॅटैनी

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

व्हिलन आपल्या आलिशान बंगल्यात एका भल्या मोठ्ठ्या खुर्चीवर रेलून बसलेला.
बाकी लोकं घरातले खांब, कोपरे धरून उभे.
घराला मध्यभागी भलं मोठ्ठं झुंबर.
व्हिलनच्या चेहऱ्यावर क्रूर हसु.
सगळी मंडळी विनाकारण हसतायेत.

अशा बेरकी व्हिलनला नमवण्यासाठी आपल्या हिरो कडे एकमेव ऑप्शन- हिरोईनचा डान्स !

आतापर्यंत हिरो सोबत अंगभर कपडे घालुन चार-पाच गाणी गायलेली आपली हिरोईन, अचानक व्हिलन समोर एकदम तोडक्या कपड्या मध्ये परफॉर्म करणार.
व्हिलन आणि गॅंग खुश !

ह्या बाई अचानक आपल्याकडे डान्स करायला का आल्यात? असा प्रश्न एकालाही पडत नाही.
सगळे डान्स बघण्यात गुंग.

हिरो समोरच्या दारातून न येता, पहिल्या माळावरील व्हिलनच्या थेट बेड रूम  मधून येणार.
वरच्या गॅलरीत तो वाघासारखा घिरट्या घालतोय.
चेहऱ्यावर भयंकर राग.
हा राग व्हिलनचा का  हिरोईनच्या डान्सचा? – हा प्रश्न आपल्या मनात.

गाणं संपणार तोच व्हिलन तिचा हात धरणार आणि हिरोची थेट वरून उडी मारून एन्ट्री !
मिनव्हाईल, हिरोईन एखाद्या कपड्याने स्वतःला झाकणार.
मग तुंबळ फायटिंग !
डायरेक्टरच्या आवडी नुसार अजुन दोन चार ट्विस्ट !
व्हिलनचा खातमा.
हिरो हिरोईनचं मनोमिलन, वगैरे वगैरे.

या सगळ्यात, सर्वात भन्नाट आयडिया म्हणजे हिरोईनचा डान्स !
म्हणजे बघा, व्हिलनला कळतच नाही आपलं एंटरटेनमेंट का चाललंय?
आणि आपण ह्या महाशयाच्या हातून का मार खातोय?
डान्स पाहिला म्हणून का बदला म्हणून?
खरं तर, हिरो दोन्ही गोष्टींमुळे चिडलाच आहे.
“एक तर सगळी मेहनत मी केली.
आणाभाका खाल्ल्या.
आणि सिडक्टीव्ह डान्स मात्र ह्याने एन्जॉय केला.”

हिरोईनने हे सगळं फक्त प्रेमापोटी केलंय, बरं का.

कोण आखतं असल्या स्त्रेटर्जी ?


इतर पोस्ट्स

इतर नोट्स